ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महेश लांडगे

नेवासा : अन्याय करणारे व त्यांना मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही नसल्याचा इशारा प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांनी दिला.नेवासा येथे हिंदू जण आक्रोश मोर्चा प्रसंगी ते बोलत होते. सोनई येथे एका प्रार्थना स्थळी पास्टर ने केलेल्या काळ्या कृत्याचा निषेध,मुस्लिम वक्त बोर्ड रद्द झाला पाहिजे,धर्मांतर बंदी कायदा लागू झाला पाहिजे,धर्मांतरासाठी बाहेर देशातून येणारी फंडिंगवरती बंदी घालावी या मागण्यासाठी नेवासा शहरात हिंदू जण आक्रोश मोर्चा नेवासा तालुक्याच्या वतीने शनिवारी सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलतांना प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे म्हणाले की अन्याय झाल्यावर एकत्र येण्यापेक्षा कायमस्वरूपी हिंदूंनी एकत्र या,आम्ही न्याय मागतो म्हणजे जातीय तेढ निर्माण करतो असे नाही,कोणत्याही नेत्याने नराधमांना फाशी द्या अशी मागणी केली नाही याचे दुःख वाटते,असा प्रकारच्या घटनांचे परिणाम आपल्या भावी पिढ्यांवर होतात याची हिंदूंनी काळजी घ्या,जाती पातीत विभागून न जाता हिंदू म्हणून जगा,आमची जात आणि धर्म फक्त हिंदूच मत त्यांनी व्यक्त केले. साध्वी दुर्गाताई म्हणाल्या की मातृ भूमीतील हा नंगानाच थांबवा,नारी शक्ती सामान्य नाही अशा घटनांबाबत जागृत होणे गरजेचे आहे,हिंदुंनी मुला मुलींना घरातच संस्कार द्या,मुलींना झाशीच्या राणी सारखे योध्या बनवा असे मत त्यांनी व्यक्त केले.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यावेळी म्हणाले की हिंदूच्या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा कायदा हातात घेवून धडा शिकवला जाईल,असे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी होत नाही तो पर्यंत हिंदू शांत बसणार नाही,पोलिसांनी खात्याने अशा नीच प्रवृत्तीला पाठीशी घालू नये,आम्ही हिंदू युवकांच्या पाठीशी खंबीरपने उभे असून मी राजकारण नाही तर हिंदू म्हणून येथे आलो आहे, यापुढे पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १५ पोलिस अधिकारी,८९ पोलिस कर्मचारी, आर सी पी पथकासह गृहरक्षक दलाचे सात जवान असा तगडा पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला होता.
पसायदानाने सभेची सांगता झाली.

newasa news online
महेश लांडगे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महेश लांडगे
महेश लांडगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महेश लांडगे
Share the Post:
error: Content is protected !!