ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भळंद

नेवासा : मोहिनी मायच्या जयघोषात भगवान विष्णू चे मोहिनी अवताराचे एकमेव स्थान असलेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिम्मित आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत शनिवारी पौर्णिमेच्या रात्री लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात “भळंद” कार्यक्रम पार पडला. रथ सप्तमी पासून सुरु झालेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रेमुळे शहरात यावर्षी तरुण वर्गाचा मोठा सहभाग असल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण आहे.माघ शुध्द पोर्णिमेस गावातील कुटुंबातून कुलधर्म कुंलाचार केला जातो या वेळी देवाला पूृरणपोळीचा नैवेद्यही दाखविला जातो.पोर्णिमेचे खास आकर्षण म्हणजे माघ पोर्णिमेच्या राञी मंदिरा समोरील मंडपात गोंधळ घालीत “भळंद”खेळत देवतेला यात्रा उत्सवासाठी आमंत्रण दिल जात .

.यावेळी देवीचा जागर करीत श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथीलचा “भळंदाचा” मान असलेले आदिनाथ जोशी व सौ अदिती जोशी यांनी लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात नाचत “भळंद”कार्यक्रमाद्वारे देवदेवतांना मोहिनीराजांच्या यात्रेचे निमंत्रण दिले. यावर्षी यात्रा समितीने मांडवात भाविकांची गर्दी होत असल्याने मांडवा बाहेर मोठ्या स्क्रीनचे नियोजन केल्यामुळे सर्वांना भळंद कार्यक्रम चांगल्यापणे पाहता आला. सोमवारी पहाटे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांचा महाभिषेक होऊन तहसीलदार श्री व सौ संजय बिरादर यांच्या हस्ते मानाची पूजा पार पडली यात्रेनिमित्त मंदिरावर झेंडे चढवायची परंपरा आहे याचे जे आज पहिल्या दिवशी कुटे कुटुंबीयांना झेंड्याचा पहिला मान आहे नेवासा बुद्रुकचे ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांसह कुटे कुटुंबियांनी वाजत गाजत मानाचा झेंडा मंदिरावर चढवला.

दुपारी एक वाजता मोहिनी राजाची उत्सव मूर्ती पालखीतून वाजत गाजत पाक शाळेमध्ये पाच दिवसाच्या मुक्कामाला आली वर्षभर पवित्र सावळ्या मध्ये असलेली मोहिनी राजाची मूर्तीला आता सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील भाविकांना हात लावून दर्शन घेता येणार आहे. आज मंदिरातून निघालेली पालखी जुन्या कोर्ट गल्ली मार्गे पाकशाळेमध्ये गेली यावेळी संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळी काढून सुशोभित करण्यात आले होते. मार्गावरील प्रत्येक घरामध्ये असलेल्या गृहिणींनी मोहीनिराजाची पूजा केली मिरवणुकीत गावकऱ्यांनी मोठा सहभाग घेतला होता. आजपासून पाच दिवस देव पाक शाळेमध्येच मुक्कामी असतात. या पाच दिवसांमध्ये हजारो भाविकां च्या जेवणाच्या पंगती उठत असतात पहिल्या दिवशी गुगळे परिवाराची मानाची पंगत असते या पंक्तीला वरण-भात शिरा असा प्रसाद दिला जातो याला सुद्धा संपूर्ण गावकऱ्यांना जेवण देण्यात येते.

newasa news online
भळंद

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भळंद
भळंद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भळंद
Share the Post:
error: Content is protected !!