ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

झेंडा

नेवासा – नेवासा नगरीचे ग्रामदैवत भगवान विष्णूंचा स्त्री रूप अवतार असलेल्या श्री मोहिनीराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिरावर लावण्यात येणाऱ्या झेंडयाचे पूजन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी “श्री मोहिनीराज महाराज की जय”असा जयघोष करत वाजत गाजत पोलीस ठाण्याच्या आवारातून झेंडा मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला नेवासा शहराच्या मुख्य मार्गावरून सदरची मिरवणूक ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या मंदिर प्रांगणात आली सदरील झेंडा मंदिरावर चढविण्यात आला व झेंडा मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.यावेळी यात्रा कमिटी व देवस्थानच्या वतीने श्रीफळ देऊन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक भोंबे, पोलीस उपनिरीक्षक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक पाटिल, पोलीस उपनिरीक्षक ससाणे, पोलीस हवालदार बबन तमनर, पोलीस नाईक सुमित करंजकर,काळोखे, गोपनीय शाखेचे आवि वैद्य, गणेश फाटक, गणेश जाधव, मोहन गायकवाड, अशोक टेमकर, दिलीप गायकवाड, श्रीकांत ससे, अल्ताफ शेख , शशिकांत चक्रनारायण, अरुण देवढे , मोटे, ताके, देवकर, महिला होमगार्ड रुख्मिनी सावंत , मनिषा खादे, सरिता आगळे,उपस्थित होते

कुटे पाटील यांच्या परीवाराच्या वतीने मंदिरावर लावण्यात येणाऱ्या मानाच्या पहिल्या झेंडयाचे पूजन श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य सुनीलगिरी महाराज व मध्यमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषिनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले व झेंडा मंदिरावर चढवण्यात आला.

newasa news online
झेंडा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

झेंडा
झेंडा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

झेंडा
Share the Post:
error: Content is protected !!