ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शंकरराव गडाख

नेवासा – मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त आ. शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने झेंडा मिरवणूक काढण्यात आली. मळगंगा देवीच्या मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. श्री मोहिनीराज देवस्थान व यात्रा उत्सव समितीने यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उत्सवाचा आनंद तालुक्यातील जनतेने घ्यावा, आवाहन असे आ. शंकरराव गडाख यांनी केले.मिरवणुकीच्या पुढे ढोल पथक, ताशा पथक पारंपरिक वेशभूषा करीत सहभागी झाले हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते.

श्री मोहिनीराज महाराज की जय.., जय भवानी, जय शिवाजी…या घोषणांनी नेवासा नगरी दुमदुमली होती. मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुणांसह नेवासकर सहभागी झाले होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, तोफांची सलामी देत चौकाचौकात मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. बसस्थानक चौकातून मिरवणूक निघाली.पंचायत समिती चौक, गणपती चौक,नगरपंचायत चौक, मारुती चौक मार्गे श्री मोहिनीराज मंदिरात आली. येथेच मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर गडाख यांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर श्री मोहिनीराज देवस्थान व यात्रा उत्सव समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

newasa news online
शंकरराव गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शंकरराव गडाख
शंकरराव गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शंकरराव गडाख
Share the Post:
error: Content is protected !!