ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गांजा

आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी साहेबराव मारुती ठाणगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अडीच किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. नगर तालुका पोलिसांनी २६ फेब्रुवारीस ही कारवाई केली.मंगेश साहेबराव खरमाळे यांनी याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, २६ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता सपोनि गिते,पोसई रंजीत मारग, पोकाँ  टकले आदींसह अवैध धंद्याची माहिती काढत असताना जखणगाव ते हिवरेबाजार रोडवर हिवरेबाजार शिवारात साहेबराव मारुती ठाणगे यांनी शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली.

त्यांसुर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता शेतात गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याचे निदर्शनास आले. तेथे ५००० रुपये किमतीचा अडीच किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.आदर्शगाव हिवरे बाजार या गावाची ख्याती जगभरात आहे. शेती, पाणी व्यवस्थापन, श्रमदान आदींसह अनेक गोष्टींचा आदर्श घेण्यासाठी विविध राज्यातून लोक या ठिकाणी येत असतात. परंतु आता याच गावच्या शिवारात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

गांजा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गांजा
गांजा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गांजा
Share the Post:
error: Content is protected !!