ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

गणेशवाडी – दि. २० फ्रेबुरवारी रोजी भर दुपारी २ वाजेच्या सुमारास मारहाण करत लुटमार केल्याची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार सोनई येथील पुरातण असलेल्या महादेव मंदिर रस्त्यावर भर दुपारी अडवून लांडेवाडी येथील नामदेव अशोक कोरडे व त्याचे मित्र स्वतः च्या दुचाकीवरून जात असताना आरोपी वैभव वाघ, सचिन पवार, सचिन वैरागर, अभिषेक त्रिभुवन, गणेश वैरागर, बापु वैरागर,

दादासाहेब शंकर वैरागर सर्व राहणार सोनई यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र यांना अडवून हातातील तलवार, लोखंडी राॅड, गलवर अशा हत्याराने जबर मारहाण करत फिर्यादी च्या गळ्यातील दिड तोळ्याची चैन ओरबाडून फरार झाले . भर दिवसा सोनई मध्ये रस्ता लुटीचा प्रकार घडल्याने या ठिकाणी येणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २६ रोजी फिर्यादी यांनी नगर येथील दवाखान्यात दिलेल्या जबाबा वरुन आरोपी विरुद्ध गुरन. ८०/२०२४ भाद. वि कलम ३०७,३२६,३२४,३२३,३४१,३२७,१०९,५०६,१४३,१४७,१४९,सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे पोसई सुरज मेढे हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
Share the Post:
error: Content is protected !!