ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नरहरी महाराज

नेवासा – नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावर असलेल्या संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने नेवासा येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रतिमा मिरवणूक प्रवचनासह महाप्रसादाचे वाटपाने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सकाळी वेदमंत्राच्या जयघोषात मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर नेवासा शहरातून संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत नेवासा तालुक्यातील सुवर्णकार समाज बांधवांसह नेवासा येथील हनुमान भजनी मंडळाचे वारकरी सहभागी झाले होते.

सदरची मिरवणूक नेवासा शहराच्या मुख्य पेठेत आली असता फटाक्यांची आतषबाजीने मिरवणुकीचे नेवासकरांनी स्वागत केले.पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये संत नरहरी महाराजांची प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.यावेळी सुवासिनींनी पंचारती ओवाळून प्रतिमेचे पूजन केले.मिरवणुकीच्या प्रसंगी रस्त्यावर सडारांगोळया घालून स्वागत करण्यात आले. सदर मिरवणुकीत सुवर्णकार समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मिरवणुकीचा समारोप संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोडवर असलेल्या श्री नरहरी महाराजांच्या मंदिर प्रांगणात झाल्यावर कृष्णा डहाळे यांनी आलेल्या सुवर्णकार बांधवांचे स्वागत केले.रामायणाचार्य हभप श्री नंदकिशोर महाराज खरात यांचे संत नरहरी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रवचन झाले.नरहरी महाराजांच्या गाथाचे जीवनात पारायण करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव डहाळे व कोषाध्यक्ष श्रीकांत डहाळे यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.

संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या युवती,बालिका, सुवासिनी यांचा पारितोषिके देऊन यावेळी गौरव करण्यात आला.तर पुण्यतिथी सोहळयासह मंदिर परिसर विकास कामांसाठी देणगीच्या रूपाने योगदान देणाऱ्या दात्यांचा यावेळी शाल श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.आरती झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.नेवासा तालुक्यातील सुवर्णकार समाज बांधवांसह नेवासा शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newasa news online
नरहरी महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नरहरी महाराज
नरहरी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नरहरी महाराज
Share the Post:
error: Content is protected !!