ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिव महापुराण

गणेशवाडी – गणेशवाडी येथील पुरातन घृष्णेश्वर महादेव मंदिरात सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात ये बसते. यावर्षी शिव महापुराण कथेचे आयोजन केले असल्याचे सत्यम मित्र मंडळाचे अध्यक्ष पप्पुशेठ टेमकर यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात शनिवार दिनांक २मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ह भ प महंत सुनीलगीरी महाराज श्रीराम साधना आश्रम मुकिंदपुर नेवासा आणि ह भ प रामेश्वर शास्त्री तांदळे महाराज आश्रम राजेगाव रोड घोडेगाव यांचे हस्ते धर्म ध्वज स्थापनेने होईल.

साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली आदिशक्ती योगमाया मुक्ताबाई मठ तोंडारपाटी तालुका उदगीर जिल्हा लातुर यांच्या रसाळ ,सुमधुर वाणीतुन शिव महापुराण कथा भाविकांना शनिवार दिनांक २मार्च ते ९मार्च पर्यंत रोज सायंकाळी सहा वाजता महादेव मंदिर येथे श्रवण करता येणार आहे. शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी महाशिवरात्र सकाळी घृष्णेश्वर महादेवास जलाभिषेक,पुजा ,फराळ वाटप दुपारी श्री घृष्णेश्वर महादेव यांची शोभा यात्रा होईल.


शनिवारी दिनांक ९ रोजी सकाळी ९ते ११ यावेळेत ह भ प साध्वी दुर्गादेवी कर्मयोगीनी आश्रम आलियाबाद तालुका पैठण यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल. तरी या शिवमहापुराण कथा श्रवण, काल्याचे किर्तन, महाप्रसाद चा लाभ परिसरातील शिवभक्तांनी घ्यावा असे आवाहन पप्पुशेठ टेमकर अध्यक्ष सत्यम मित्र मंडळ, घृष्णेश्वर महादेव मंदिर सेवा समिती आणि ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे.

शिव महापुराण
शिव महापुराण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिव महापुराण
शिव महापुराण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिव महापुराण
Share the Post:
error: Content is protected !!