ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलिओ

खेडले परमानंद – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आज नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद सब सेंटर येथे पल्स पोलिओ बूथ चे उद्घाटन समाजसेवक पत्रकार संभाजी शिंदे यांच्या हस्ते बाळाला दोन थेंब पोलिओचे पाजून करण्यात आले.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी -डॉ भुसारी पी ई आरोग्य सेविका- श्रीमती तमनर पी पी,आरोग्य सेवक श्री पाटोळे आर आर,आशा सेविका – श्रीमती शिंदे वाय ए, परिचर- श्रीमती राजळे एस एस ,ग्रामस्थ संतोष राजळे ,शरद बर्डे,माजी सरपंच विमल शिंदे,गायत्री शिंदे,आदींसह लाभार्थी बालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी प्रसार माध्यम व प्रत्यक्ष भेटीद्वारे अथक परिश्रम घेतले. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व पालकांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी आपल्या बालकांना बुथवर घेऊन यावे व पोलिओ मुक्त भारत अभियानामध्ये आपले मोलाचे सहकार्य द्यावे.

पोलिओ
पोलिओ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलिओ
पोलिओ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलिओ
Share the Post:
error: Content is protected !!