ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

माऊली कुटे

नेवासा –“पाने को अभी बहुत मुकाम बाकी है, इस खेल के अभी बहुत इमतेहा बाकी है,अभी तो नापी है अपने मिट्टीभर जमीन ,अभी तो आगे पुरा आसमान बाकी है…!” याच शेर ला तंतोतंत लागू असणारे आमच्या गावातील सर्वांचे लाडके, अतिशय मनमिळाऊ, दिलदार स्वभावाचे, सर्वांना मदत करणारे श्री. ज्ञानेश्वर (माऊली) कारभारी कुटे…!” महान असे शेक्सपिअर जरी म्हणत असले नावात काय आहे? परंतू जे नाव आपल्या आई- वडीलांनी काहीतरी विचार करून ठेवलेले असते ना त्यामागे नक्कीच मोठ्या, महत्त्वाच्या गोष्टी असतात.

श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासा तिर्थक्षेत्र असलेल्या गुलक्यातीह उस्थळ दुमाला या गावी जन्मलेल्या श्री. ज्ञानेश्वर कारभारी कुटे यांची ख्याती, नाव तर संपूर्ण अहमदनगर जिल्हाच नाही तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत चालले आहे. अत्यंत कडक, शिस्तप्रिय पण वेळप्रसंगी जीव पण लावणाऱ्या मातोश्री सुभद्राबाई कारभारी कुटे यांच्या पोटी दि. ०४ ऑक्टोबर १९७६ रोजी श्री. माऊलींनीचा (ज्ञानेश्वर) जन्म उस्थळ दुमाला या खेड्यागावात झाला. अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत, परिस्थितीअभावी १२व्या वर्षीच शाळा सोडावी लागली. परंतु “मनामध्ये एकच ती म्हणजे जिद्द…!”

माऊलीजींनी लहानपणापासूनच कर्माला जास्त प्राधान्य दिलं. कोणत्याही कामाची लाज न बाळगता भेटलेले काम आनंदाने त्यांनी केले. शेतातील काम, रोजगारी मिळवण्यासाठी असलेले गाडी, ट्रॅक्टर, ट्रक चालवणे त्यांचा जणू छंदच ! असंच काम करत असताना उस्थळ गावातील गायकवाड पाटील यांच्याकडे ते काम करू लागले होते. असेच काम करताना एक दिवस प्रमाणापेक्षा जास्त भरलेली ऊसाची ट्रक उस्थळ दुमाला हून भेंडा येथील ऊस कारखान्याकडे सुखरूप आणली.

या कामगिरीबद्दल आदरणीय दारकनाना गायकवाड आणि पंढरीनाथ दादा गायकवाड यांनी माऊलीजींना सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून दिली. याच कौतुकाच्या जोरावर व भक्कम साथ असणारे त्यांचे जवळचे नातलग मामा श्री. गोकूळदास कराड यांच्या सहकार्याने पुढे त्यांनी एक क्रुझर खरेदी करून जिद्दीने नवीन व्यवसाय सुरवात केली. त्यात त्यांनी नेवासा फाट्यावरील असणाऱ्या शाळेतील मुलांच्या जाण्या-येण्याची व्यवस्था केली. हे शिक्षणविषयी सेवा देण्याचे कामामुळे हळूहळू या व्यवसायाची वाढ होत गेली. नंतर त्यांनी एक मिनी बस घेतली.

त्यासंदर्भात माझाही एक प्रसंग मी सांगतो की, मी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये बी. एस्सी.ला शिकत असताना रोज उस्थळ दुमाला हून नेवासाफाटा येथे जायचो तर एक दिवस त्यांनी मला श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा विद्यालयाजवळून जात असताना पाहिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बस थांबवून मला विचारले की “आजपासून बसमध्ये येत जाशील का? मी सोडतो तुला नेवासा फाट्यावर…!” या प्रसंगावरून त्यांची शिक्षणाप्रती असणारी ओढ दिसून येते. माझे मत असे की, माऊलीजींचे शिक्षण जरी कमी असले तरीपण दुसऱ्यांच्या शिक्षणाला कोणत्याही माध्यमातून मदत कशी करता येईल. हे कळून येते आणि शिक्षणाचे काम देखील त्यांच्या मुलांच्या सध्या शिकत असलेल्या शिक्षणातून दिसून येते.

कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना अगदी शुन्यातून विश्व निर्माण करायचे हे माऊलीजींकडून शिकण्यासारखे आहे. मला असे वाटते व्यवसायक्षेत्रातील नवीन युवकांचे प्रेरणास्थान माऊलीजी नक्कीच असणार. कारण आहे की, एका क्रुझर गाडीच्या बळावर त्यांनी हळूहळू एक-एक नवनवीन बस खरेदी करत सध्या त्यांच्या ताफ्यामध्ये १४ बस, २ क्रुझर, २ स्कॉर्पिओ, १ बोलेरो आहेत. तरीही अत्यंत साधेपणा, मीपणा, गर्व कधीही दिसून येत नाही.

नेवासा तालुक्यामधील कोणत्याही शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा मोलाचा वाटा कायम असतो. दरवर्षी होणाऱ्या श्री स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान येथील शिवरात्रीनिमित्त भाविकांना मोफत बसची सुविधा ते न चुकता करतात. माऊलीजींसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही असेल की मागच्या १० ते १५ वर्षांतील जेवढे मुले-मुली बसमधून जात येत होते ते कायम माऊलीजींना ओळखतात भले ते कोणत्याही मोठ्या पदापर्यंत गेले असले तरी, या पेक्षा कामाची पावती कोणती असू शकते?

ओळखीच्या लोकांना नेहमी मदत ते करतातच परंतू अनोळखी लोकांना देखील ते तितक्याच पद्धतीने मदत करण्यात कमी पडत नाही. गरीब परिस्थितीत खचून न जाता जिद्द, चिकाटीच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरापर्यंत पोहचतो. हे एक उदाहरण माऊलीजींकडून आपल्याला दिसून येते. माऊलींसाठी मी एकच म्हणेल की,

“जगामध्ये जे-जे साधं असतं, ते सामर्थ्यशाली असतं, आणि जे सामर्थ्यशाली असतं जे जग बदलतं!”

“पुढील सर्व कार्यासाठी माऊलीजींना माझ्याकडून अनंत शुभेच्छा…!!!”

शब्दांकन-सचिन शोभा लक्ष्मण लोखंडे
(MPSC दिनविशेष आणि व्यक्तिमत्त्व विकास पुस्तक लेखक)

newasa news online
माऊली

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

माऊली
माऊली

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

माऊली
Share the Post:
error: Content is protected !!