ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भास्करगिरीजी महाराज

देवगड फाटा – नेवासा तालुक्यातील नावलौकिक असलेल्या भू-लोकी स्वर्ग म्हणून ओळख असलेले देवगड देवस्थान येथे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंत्र वेद व आरती तसेच शिवलीलामृत वाचन सोहळा संपन्न झाला.

त्यामध्ये आज सकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली त्यानंतर दुपारच्या बारा वाजता महायज्ञ सोहळा यांना मंडपामध्ये गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज तसेच उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.या यज्ञ सोहळ्यासाठी भेंडा येथील वेदशास्त्रज्ञ कुलकर्णी गुरु तसेच सलाबतपुर येथील केदार जोशी यांच्या सहयोगाने नाममंत्र घोष करण्यात आला दिवसभर महादेवाचा होमवन सायंकाळी तसेच आरती करण्यात आली .यावेळी नेवासा तालुक्यातील तसेच जिल्हाभरातील भावीभक्त देवगड देवस्थान येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी ये जा करत होते.या वेळी देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज बोलताना म्हणाले की होम हवन करण्यासाठी दांपत्याची गरज असते देशामध्ये असे काही कार्यक्रम असतात त्यावेळी दांपत्याची गरज असते तसेच शिव आणि शक्ती मिळूनच हे कार्यक्रम पार पडत असतात.

शिवशक्तीचे प्रतीक हे पती आणि पत्नी असते त्यांच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम शिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला पार पाडायचे असतात वैदिक सनातन धर्माचा हा मोठा विचार असून वेद हे सर्व हितार्थ असून वेदाने सर्व हिताचाच विचार केला आहे वैदिक कर्म हे आपण पार पडले पाहिजे वैदिक सनातन धर्माच्या नियमाप्रमाणे जे जे आपले महोत्सव आहेत ते साजरे केले गेले पाहिजे देवांच्या संतांच्या विधीने त्या पार पाडायचे असतात तसेच पुढे बोलताना बाबाजी म्हणाले की गृहस्थ आश्रमात लग्नकार्य असेल आधीक काही कार्यक्रम ते सर्व आपल्याला विधिवत पार पाडायचे असतात एक विधी आणि दुसरा निषेध या दोन गोष्टीचा आपण विचार केलाच पाहिजे जे वेदाने सांगितले आहे ते केले पाहिजे गुरु मंडळी आपल्याला हा सर्व विचार या माध्यमातून देत असतात.

असेच कार्यक्रम ठीक ठिकाणी झाले तर त्याची ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा देशामध्ये राहणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी कारणी ठरत असते तीळ, तांदूळ तसेच अदी नैसर्गिक काही गोष्टी होमामध्ये टाकल्यानंतर निसर्गामध्ये जे प्रदूषण झालेले आहे ते या होम हवनाने व त्या वनस्पतीने दूर होत असते त्यामुळे होम हवन विधी केला जातो तसेच होम हवनाच्या ठिकाणी सुपारी रूपामध्ये देवता त्या ठिकाणी प्रस्थापित झालेले असतात तसेच होम हवनाच्या ठिकाणी ठेवलेले सुपारी ही देवतेचे प्रतीक म्हणून मानले जाते तसेच त्या देवतांचे माना प्रमाणे पूजा केली जाते तसेच आपण या होम हवनाच्या निमित्ताने प्रार्थना करत असतो की वैयक्तिक आम्हाला आमचे दुःख घालवायचे नसून आम्हाला आमच्या देशावरती आमच्या धर्मावरती आमच्या माणुसकीवर ज्या ज्या वेळी जे जे संकट येईल ते संकट आपण निवारण करा बसलेल्या देवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे.

व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असू नये ही संतांची भावना आहे यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी या यज्ञाच्या प्रसंगी सर्वांचे कल्याण व सर्वांचे दुःख दूर व्हावे ही प्रार्थना भगवान शंकरांना केली.या शिवरात्रीच्या होम हवन यज्ञ कार्यक्रम प्रसंगी देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते आरती व पूजन करण्यात आले .या होम हवन कार्यक्रम प्रसंगी भेंडा येथील कुलकर्णी गुरु तसेच सलाबतपूर येथील केदार देवा जोशी गुरु उपस्थित होते.

या महाशिवरात्रीच्या निमित्ताने देवगड देवस्थान हर हर महादेव दत्तात्रय भगवान की जय या नामघोषाने दुमदुमून गेले होते सकाळी पहाटेपासूनच ते सायंकाळ पर्यंत भाविकांची मोठी गर्दी देवगड देवस्थान येथे पहावयास मिळत होती.तसेच येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची ही व्यवस्था करण्यात आली होती तसेच देवगड देवस्थान येथे आज अनेक साधुसंतांनी तसेच राजकीय मंडळींनी दर्शनासाठी भेट देऊन दत्तात्रय भगवंताचे तसेच महादेवाचे दर्शन घेतले.यावेळी देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज तसेच देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, संत सेवक बाळू महाराज कानडे, शुभम महाराज बनकर, तात्या महाराज शिंदे , दत्ता महाराज शिंदे,तसेच अदी देवगड भक्त परिवारातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newasa news online
भास्करगिरीजी महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भास्करगिरीजी महाराज
भास्करगिरीजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भास्करगिरीजी महाराज
Share the Post:
error: Content is protected !!