ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महिला

नेवासा –विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या आदेशान्वये नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यात 2021 पासून हरवलेलल्या व्यक्ती शोधण्याची विशेष मोहीम राबवली गेली.

या मोहिमेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांनी देखील कामगिरी केली आहे. मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कल्लूबर्मे व उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व नेवासा पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील सन 2021 पासून हरवलेल्या व निघून गेलेली व्यक्ती मागील पाच दिवसापासून विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. सदर शोध मोहिमेमध्ये 24 महीला व 16 पुरुष मिळून आलेले आहेत.

घरातील व्यक्ती निघून गेल्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग तक्रार नोंदवली जाते. अनेकदा निघून गेलेली व्यक्ती काही दिवसांनी घरी परत येते, परंतु त्याबाबत पोलिसांना माहिती दिली जात नाही. काही दिवसांनी कामाच्या व्यापामध्ये पोलीस देखील ईतर कामाकडे वळाल्याने सदर व्यक्तीचा पूर्ण शोध होत नाही, निघून गेलेल्या बहुतांशी व्यक्ती पुढील काळात घरी परत येत असतात. अशा व्यक्तींची विशेष शोध मोहीम नेवासा पोलिसांनी राबवली होती.

घरातील व्यक्ती निघून गेल्या बाबत पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग नोंदवली असेल आणि अशा व्यक्ती जर परत आल्या असतील तर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

newasa news online
महिला

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महिला
महिला

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महिला
Share the Post:
error: Content is protected !!