ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महादेव

नेवासा – महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील सुरेशनगर-हंडीनिमगावच्या मध्यावर असलेल्या स्वयंभू महादेव श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे हर हर महादेव गजर करत विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचा साजरा करण्यात उत्सव आला. त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दिवसभरात हजारो भाविकांनी स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन घेतले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्रम्हलिन भक्त प्रल्हाद महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने पंच दिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहाटेच्या सुमासस वेदमंत्राच्या जयघोषात त्रिवेणीश्वर शिवलिंगास माठाधीपती रमेशानंदगिरी महाराज यांच्या हातात रुद्राभिषेक, दुधाचा अभिषेक घालण्यात आला. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून मंदिराच्या सभामंडपात दर्शन बारी तयार करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन त्रिवेणीश्वराचे दर्शन घेतले.

यावेळी दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा व भक्त परिवारातील सदस्यांचा महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्रिवेणीश्वर भक्त मंडळाचे सर्व सेवेकरी हे तनमन धनाने याठिकाणी सेवा देऊन स्वयंसेवकाची भूमिका बजवताना दिसत होते. त्रिवेणीश्वर मंदिर प्रांगणातील महान तपस्वी ब्रम्हलिन भक्त प्रल्हाद महाराजांचे समाधी मंदिर, हनुमान मंदिर, अन्नपूर्णा माता मंदिर येथे ही भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर प्रत्येक भाविकास शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन झाले. तर रात्री ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे कीर्तन झाले. नगर – संभाजीनगर हायवेवरील त्रिवेणीश्वर मंदिराच्या मुख्य कमानीपासून ते त्रिवेणीश्वर मंदिराच्या प्रांगणात यात्रा भरली होती.

खेळणी, सौंदर्यप्रसाधने, गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल, रसवंती गृहे, शीतपेयांची दुकाने ही मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती. मंदिर प्रांगणात करण्यात आलेली कारंजा आरास देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जिल्हा परिषद आदर्श शिक्षक – पुरस्कार विजेते रेवणनाथ पवार यांनी दिवसभर सूत्रसंचालन करून आलेल्या मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सुरेशनगर हंडीनिमगाव येथील त्रिवेणीश्वर भक्तमंडळ व स्वयंसेवकांनी दिवसभर सहकार्य केले.

newasa news online
महादेव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महादेव
महादेव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महादेव
Share the Post:
error: Content is protected !!