ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिंगवेतुकाई

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई येथे ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ७ मार्च रोजी रात्री १० वाजता फिर्यादी, आरोपी, मुलगा हे सर्वजण एकत्रित जेवण करत असतात आरोपीने घरात मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली . मुलाने आरोपीस शिवीगाळ करु नका असे सांगितले त्याचा राग मनात धरून समोरच असणाऱ्या हाॅटेल क्रुष्णा मधुन चाकु घेऊन येत मयत रवींद्र पुंड याच्या वर सपासप वार करत खून केला.

तशा आशयाची फिर्याद मयताची पत्नी ज्योती रवींद्र पुंड रा. शिंगवेतुकाई शिवार हाॅटेल क्रुष्णा मागे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आरोपी भिमराज किसन पुंड याचे विरुद्ध गु र न कलम १००/२०२४भादवी३०२, ५०४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखुन तातडीने घटनास्थळी सोनई पोलीसांनी धाव घेत आरोपीस तातडीने ताब्यात घेत कोर्टासमोर हजर केले असता तिन दिवसांची पोलीस कस्टडी घेतली. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे पोसई सुरज मेढे हे करत आहे.

शिंगवेतुकाई
शिंगवेतुकाई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिंगवेतुकाई
शिंगवेतुकाई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिंगवेतुकाई
Share the Post:
error: Content is protected !!