ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

काँग्रेस

नेवासा – देशात राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले असून नेवासे तालुक्यातील काँग्रेसला उज्ज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष जयंत वाघ यांनी केले आहे. लोकसभा तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून तालुक्याच्या ठिकाणी बैठकांचा सपाटा सुरू केला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नेवासे तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी जयंत वाघ बोलत होते.

देशात बदलाचे वारे असून येणारा काळ हा काँग्रेसचा असणार आहे व काँग्रेसचा कार्यकर्ता हा पुढच्या काळातला हिरो ठरणार असल्याचे या वेळी जयंत वाघ यांनी स्पष्ट केले.राज्याचे माजी महसूल मंत्री व विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेसने आता मरगळ झटकली असून पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तन मन धनाने काँग्रेस पक्षाच्या संघटन वाढीकडे लक्षदेत असून येणाऱ्या पिढी उज्ज्वल भविष्याची मुहूर्तवेढ या माध्यमातून रोवली जाणार असल्याचे या वेळी वाघ यांनी स्पष्ट केले. नेवासा तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित या बैठकीत नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पटारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे,जिल्हा उपाध्यक्ष संपतराव म्हस्के, प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अभिजीत लुणिया, कार्लस साठे नेवासा तालुका निरीक्षक ज्ञानेश्वर मुरकुटे यांची यावेळी भाषणे झाली याप्रसंगी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे , माजी कुलगुरू प्राध्यापक अशोक ढगे सर समन्वयक वसंतराव रोटे जगन्नाथ पाटील कोरडे महिला काँग्रेसचे अध्यक्ष शोभाताई पातारे, शहराध्यक्ष अंजूम शेख उपाध्यक्ष बाळासाहेब झावरे ,परिवहन विभागाचे संदीप मोटे द्वारकानाथ जाधव मुसाबाई बागवान संजय सावंत अशोकराव नांगरे, उत्कर्षा रूपवते, सुरेंद्र मंडलिक संकेत वाघमारे रंजन जाधव रमेश जाधव आदीसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अशोक ढगे सर यांनी मानले.

newasa news online
काँग्रेस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

काँग्रेस
काँग्रेस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

काँग्रेस
Share the Post:
error: Content is protected !!