ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सुपारी

यशोधरानगर आणि कामठी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत 1500  किलो विक्रीला आणलेली सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे.

अनेकांना पान (Betel) खाण्याची सवय असते, मात्र तुम्ही खात असलेल्या पानमधील सुपारी तुम्ही कधी तपासून पाहतात का?, कारण नागपुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत चक्क सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सुपारी (Areca Nut) पान आणि गुटखा तयार करण्यासाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या (Nagpur) यशोधरानगर आणि कामठी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत 1500  किलो विक्रीला आणलेली सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे. त्या नंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नागपुरात चक्क सडलेली सुपारी विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावत कारवाई केली. यावेळी पोलिसांच्या पथकाला तब्बल 1500 किलो सडलेली सुपारी मिळून आली. त्यामुळे याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असून, सुपारीचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे. 

राजीव पुलिया येथील अनुसया नगरजवळ असलेल्या विनस ट्रेडर्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यात सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे. ही सुपारी विक्रीसाठी पाठवली जात होती. लाखो पान दुकाने आणि शेकडो गुटखा कंपन्यांच्या माध्यमातून सडलेली सुपारी सर्वसामान्यांना खायला दिली जात आहे. त्यामुळे कॅन्सरची मोठी वाढ झाल्याचे तज्ञांचे मत आहे. पोलिसांनी केलेल्या  या कारवाईनंतर आणखी काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. 

सुपारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुपारी
सुपारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुपारी
Share the Post:
error: Content is protected !!