ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मनोज जरांगे

पोघटनेच्या तब्बल दीड महिन्यानंतर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस किती सतर्क असतात, हे पुन्हा एकदा निदर्शनास आलंय. मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांची दीड महिन्यापूर्वी वाघोली (पुणे) इथं पहाटे सभा पार पडली होती. या सभेची पोलिसांनी दीड महिन्यानंतर दखल घेत जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीतून मुंबईला उपोषणासाठी जात असताना जरांगे पाटील यांची पुण्यातल्या वाघोलीत पहाटे सभा झाली होती. या सभेसाठी समन्वयकांनी सभेसाठी लोणीकंद पोलीस ठाण्यात रितसर अर्जदेखील केला होता. पोलिसांनी समन्वयकांना सूचना दिल्या होत्या. जरांगे पाटील या सभेला पहाटे चार वाजता आले होते. आयोजकांनी विनापरवाना लाऊड स्पीकर लावून सभा घेत कायद्याचं उल्लंघन केलं. म्हणून पुणे पोलिसांनी दीड महिन्यानंतर (दि. ७) जरांगे पाटील त्याचबरोबर गणेश मस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील यांच्यासह आठ ते दहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मनोज जरांगे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मनोज जरांगे
मनोज जरांगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मनोज जरांगे
Share the Post:
error: Content is protected !!