ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

डॉक्टर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शासकीय रुग्णालयातील एक डॉक्टर नशेच्या अमलाखाली रुग्णालयात विवस्त्र अवस्थेत फिरताना आढळून आला आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर डॉक्टर नशेखोर असून तो बिडकीनच्या शासकीय रुग्णालयात काम करतो. छत्रपती संभाजीनगरपासून २० किमी अंतरावर हे रुग्णालय आहे. अद्याप डॉक्टरचे नाव कळू शकलेले नाही.

सीसीटीव्ही चित्रणानुसार सदर डॉक्टर नशेची अमलाखाली विविस्त्र होऊ फिरताना दिसत आहे. प्रसाधनगृहात जात असताना तो आपले कपडे बाहेरच काढत असल्याचेही दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आरोग्य सेवेचे प्रमुख डॉ. दयानंद मोतीपावले यांनी इंडिया टुडे या वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी सांगितले की, वैद्यकीय अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून ते सखोल चौकशी करत आहेत. तसेच दोषी डॉक्टरवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉक्टर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

डॉक्टर
डॉक्टर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

डॉक्टर
Share the Post:
error: Content is protected !!