ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

सुनीताताई गडाख यांच्या उपस्थित आ गडाखांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा घेतला निर्णय.

नेवासा – तालुक्यातील नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप युवा मोर्चा कार्यकरणी सदस्य सुभाष संभाजी वाघमारे यांनी पुनतगाव यांनी आ शंकररावजी गडाख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे,
गेल्या आठवड्यात नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप युवा मोर्चा कार्यकारणीमध्ये सुभाष वाघमारे यांची कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती झालेली होती.

नेवासा भाजपात सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण व पक्षासाठी काम करण्याऐवजी स्थानिक नेतृत्व स्वतः कडे च लक्ष देत असल्याने पक्षाच्या ध्येय धोरणाकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने वाघमारे यांनी भाजपला सोडचिट्टी दिली आहे, नेवासा भाजपची गळती थांबण्याचे काही नाव घेत नाही, भाजप पक्षाची गळती सुरूच आहे. मा सभापती सौ सुनीताताई गडाख यांच्या उपस्थितीत वाघमारे यांनी नेवासा तालुक्याचे विकासात्मक नेतृत्व करणारे माजी मंत्री आमदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी प्रवीण वाघमारे, विकास वाघमारे, कय्युम इनामदार, महेश वाघमारे, पांडुरंग हिवाळे उपस्थित होते.

newasa news online
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख
Share the Post:
error: Content is protected !!