ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

काँग्रेस

नेवासा – लोकशाहीच्या संरक्षणासाठी काँग्रेसची विचारधारा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस कमिटीच्या राज्य महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी यावेळी बोलताना केले. नेवासा येथे आयोजित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा झालेल्या बैठकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार उत्कर्षा रुपवते हया बोलत होत्या.तर काँग्रेसचे नूतन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष जयंतराव वाघ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

सदर बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना उत्कर्षा रुपवते म्हणाल्या की लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसची विचारधारा काळाची गरज आहे त्यासाठी जनतेने विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन करून त्यांनी राष्ट्राच्या जडणघडणीत काँग्रेसचे असलेले योगदान व बलिदान त्याग आपल्या भाषणातून बोलतांना विषद केला.अध्यक्षीय भाषणात जयंत वाघ म्हणाले की आपल्या लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचे संकट आले आहे सत्तेचा दुरुपयोग करून केंद्र सरकार नेत्यांना त्रस्त करत आहेत त्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागृत राहून निवडणुकांमध्ये सक्रिय भाग घेतला पाहिजे.

ज्ञानदेव वाफारे यांनी निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात सविस्तर विवेचन केले त्यांनी नियोजनाला उच्च महत्त्व असल्याचे प्रतिपादित केले जुनी निवडणूक पद्धत पारंपारिक निवडणूक पद्धत व आता उच्च तंत्रज्ञानाची सूक्ष्म पातळीवर तसेच अभ्यासपूर्वक कार्यान्वित करण्याची निवडणूक प्रक्रिया यासंदर्भात कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले.या मेळाव्याला सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक संपतराव म्हस्के पाथर्डी विधानसभेचे निरीक्षक फ्रान्सिस साठी शेवगावचे निरीक्षक अभिजीत लुणिया,नेवासा विधानसभेचे निरीक्षक ज्ञानेश्वर माऊली मुरकुटे,

नेवासा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पटारे,अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, प्रदेश समन्वयक ज्ञानदेव वाफारे,अँड.कल्याणराव पिसाळ,वसंतराव रोटे,जिल्हा सचिव रंजनदादा जाधव,रमेश जाधव, जगन्नाथ पाटील महिला अध्यक्ष शोभा पातारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंतराव रोडे यांनी सद्यस्थितीवर प्रकाश टाकला यावेळी झालेल्या बैठकीचे सूत्रसंचालन बाळासाहेब झावरे यांनी केले तर कार्यक्रमाचे ऋणनिर्देश अत्यंत प्रभावीपणे व समारोपामध्ये सर्व त्यांच्या विचारांचा सार मांडत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी आभार मानले.

newasa news online
काँग्रेस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

काँग्रेस
काँग्रेस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

काँग्रेस
Share the Post:
error: Content is protected !!