ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गोरक्षक

गोहत्या रोखण्याच्या उद्देशाने अमरापूर, ता. शेवगाव येथे गेलेल्या गोरक्षकांवर कत्तलखाना चालकांनी केलेल्या हल्ल्यात एक गोरक्षक जबर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.या हल्यात दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. सोमवार (दि.११) रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, अमरापूर, ता. शेवगाव येथे गाईंची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्याने हिंदुत्ववादी संघटनेचे पाच सहा गोरक्षक कार्यकर्ते गोहत्या रोखण्यासाठी आले होते. तेथे त्यांच्यावर कत्तलखाना चालविणाऱ्या जमावाने हल्ला केला.या हल्यात रवि गायकवाड यास लोखंडी रॉड, लोखंडी सत्तुरने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला असून, त्यास नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जमावाने गोरक्षकांच्या दुचाकी वाहनांचीही तोडतोफ केली.

घटनेची माहिती मिळताच अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते अमरापुर येथे दाखल झाले होते. वेळी शेवगाव, पाथर्डीसह अन्य ठिकाणाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी अमरापूरला ठाण मांडले होते.याबाबत एका महिलेने मंगळवार (दि.१२) रोजी दिलेल्या फिर्यादीवरून रवि गायकवाड व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध विनयभंग, चोरी, अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, जखमी रवि गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अमरापूर येथील कुरेशी मोहल्ल्यात सहा गायी जिवंत व एकीची कत्तल केलेली होती. तेथे गेलो असता, तुम्ही कोण इथे कशाला आलात, अशी मला विचारणा करण्यात आली.

आम्ही म्हणालो गाय आमची माता असून, तिची कत्तल करू नका, तो कायद्याने गुन्हा आहे. याचा राग आल्याने लोखंडी रॉड व सत्तुरने मला व माझा मित्र महेश आसाराम जेधे यास मारहाण करण्यात आली. यावेळी जेधे तेथून पळाला.मात्र मला पकडून रॉड, सत्तुरने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दहा तोळे सोन्याची चैन व मोबाईल हिसकावून घेतला आहे. यावरुन राजु कुरेशी, अल्ताफ कुरेशी, काल्या कुरेशी, अल्तमश कुरेशी (सर्व रा. अमरापुर) यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील हे करत आहेत.

गोरक्षक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोरक्षक
गोरक्षक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोरक्षक
Share the Post:
error: Content is protected !!