ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मराठा आरक्षण

नेवासा – आई मराठा आरक्षणासाठी मी बलीदान देत असल्याचा व्हाॅटसप मॅसेज करुन गोदावरी पुलावरून उडी मारुन तरुणाची आत्महत्या केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगर येथील महेश उर्फ ओम मोहन मोरे या युवकाने १२ मार्च रोजी रात्री ९ वाजे दरम्यान छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावर मोटारसायकल लावुन आईला त्याच्या मोबाईलवरुन इंग्रजीमधून मॅसेज टाकला मिस यु आई,जय व पप्पा मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे.समाजासाठी एक जीव माझा पण. जय तु आईसोबत कायम रहा माझा मम्मी मध्ये खुप जीव आहे.

व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी

पुढे चांगली जिंदगी जगा.आय लव्ह मम्मी असा मॅसेज आईच्या मोबाईलवर टाकून गोदावरी नदीच्या पुलावरून
मराठा आरक्षणासाठी महेश मोरे या युवकाने उडी मारून आत्मबलीदान केले.त्याचा मृतदेह १३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सापडला असुन त्याचा नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.नेवासा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस.जी.ससाणे हे.कॉ.बर्डे, माने, राम वैद्य, अरविंद वैद्य, मुकिंदपुरचे सरपंच सतीश निपुंगे, राजेंद्र उंदरे, भाऊसाहेब वाघ हे उपस्थित होते.

newasa news online
मराठा आरक्षण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मराठा आरक्षण
Share the Post:
error: Content is protected !!