ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर काही तरुणांचा जमाव जमा झाला आणि त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली.

जिल्ह्यातील संगमनेर शहरात मंगळवारी दोन गटात हाणामारीची घटना समोर आली आहे. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर काही तरुणांचा जमाव जमा झाला आणि त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणाच्या मदतीला धावून आलेल्या दोघांना देखील मारहाण झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून जमावाने तिघांना मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. या मारहाणीची चर्चा शहरात पसरताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने तरुण जमा झाले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हा जमाव वाढत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत या जमावाला पांगवलं. तर, दुसरीकडे मारहाण झालेल्या घटनास्थळी सुद्धा दुसऱ्या गटातील जमाव एकत्र आला होता. यामुळे रात्री संगमनेर शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी राहुल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती असून, इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. 

क्रमांक नसलेल्या पीक-अप जीपने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीतील एकाला जमावाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी संध्याकाळी घडला. या तरुणाच्या मदतीला धावलेल्या तिघा-चौघांनाही जमावाने मारहाण केली. या घटनेत तिघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर कोल्हेवाडीसह संगमनेर शहरात तणाव निर्माण झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. मात्र पोलिसांनी जमावाला पांगवल असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच कुणीही अफवा पसरवू नयेत अन्यथा कारवाई केली जाईल असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण
Share the Post:
error: Content is protected !!