ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रंगभरण

नेवासा – नेवासा येथील तालुका विद्या प्रसारक मंडळ संचलित कै. सौ. बदामबाई धनराजशेठ गांधी विद्यालयात शिवजयंती चे औचित साधून आयोजित रंगभरण स्पर्धेतील साठ यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण ट्रॉफी देऊन करण्यात आले. बदामबाई गांधी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी तालुका विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मणराव खंडाळे,सेवानिवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत कांदे,नेवासा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असिफ शेख,शिक्षक विक्रम गोसावी,शिक्षक अरविंद घोडके, अण्णासाहेब शिंदे,राहुल आठरे, बदामबाई गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर सर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी आलेल्या मान्यवरांचे बदामबाई गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.शिवजयंतीचे औचित्य साधून तालुका विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेत सुमारे वीस शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.छत्रपती शिवरांयांचे चित्र रंगभरण स्पर्धेसाठी  ठेवण्यात आले होते असे  सांगितले. रंगभरण स्पर्धेत सहभागी वीस शाळेतील तीन बक्षिसे काढण्यात आल्याने साठ विद्यार्थ्यांना ट्रॉफी सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षक प्रशांत खंडाळे,राजेंद्र नाईक,शिक्षिका सुलभा उंडे,लता निकाळे,अनुराधा वाळुंजकर,सुरेखा चौगुले,विजय साळुंके,पालक विजय नांगरे,अनिता कुंढारे, ज्योती सरगैय्ये, सुजाता म्हस्के, भारत कदम,अंबादास चव्हाण, दत्तात्रय अहिरे,लिलाबाई माळी,राहुल तागड,शिक्षकेतर कर्मचारी कुलकर्णी, राजू पटारे यावेळी उपस्थित होते.बदामबाई शाळेच्या शिक्षिका सुरेखा चौगुले यांनी  झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिक्षक बाबासाहेब दहातोंडे यांनी उपस्थित मान्यवर व विजेते विद्यार्थ्यांचे आभार मानले.

रंगभरण
रंगभरण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रंगभरण
रंगभरण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रंगभरण
Share the Post:
error: Content is protected !!