ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोपी

गणेशवाडी – पुर्वीच्या स्वतः विरुध्दच्या गुन्ह्यात, त्या गुन्ह्यातील मुळ फिर्यादीला साथ दिली याचा राग मनात धरून, विठ्ठल डोईफोडे व त्यांच्या भावास कु-हाड, लोखंडी पाईपच्या सहायायाने मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींना मा. सत्र न्यायालय, नेवासा यांनी सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता चंद्रकांत दिनकरराव सपकाळ, यांनी काम पाहीले.

घटनेची थोडक्यात हकीकत की, आरोपीं १. निवृत्ती भाउसाहेब कजबे, २. सखाराम भाउसाहेब कजबे, दोघे रा. धनगरवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर, ३. राहुल नवनाथ पाटोळे, रा. ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर यांनी दि. २२/०५/२०१५ रोजी १९.०० वा. फिर्यादीने एका पोक्सोच्या गुन्ह्यात त्या गुन्ह्यातील मुळ फिर्यादीस आरोपींविरूध्द मदत केली होती .त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी विठ्ठल डोईफोडे व त्यांच्या भावास कु-हाड, लोखंडी पाईपच्या सहाय्याने मारहाण करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपींविरूध्द नेवासा पो. स्टेशला गन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित आरोपींविरूध्द नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.क. ६०/२०१५ भा.द.वि. कलम ३०७,३२३,५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास होवून नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक एस. जी. जोशी यांनी दोषारोपपत्र मा. कोर्टात दाखल केले.

सदर खटल्यात एकूण नऊ साक्षीदार सरकारपक्षातर्फे तपासण्यात आले. सदरचे प्रकरणात फिर्यादी, डॉक्टर व जखमी साक्षीदार यांचे जबाब, पुरावा महत्वाचा ठरला. सरकारपक्षातर्फे सादर साक्षीपुरावे व युक्तीवाद ग्राहय धरून, मा. न्यायालयाने आरोपीस दोषी धरून, शिक्षा सुनावली.

सर्व आरोपींना सदर गुन्हयात दोषी धरून, आरोपींना न्यायालयाने भा. द. वि. कलम ३०७ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व रक्कम रूपये १०,०००/- प्रत्येकी इतकी द्रव्यदंडाची तसेच भा द वि क ३२३ अन्वये ३ महिने व रूपये १,०००/- प्रत्येकी द्रव्यदंडाची तसेच, कलम ५०४ अन्वये ३ महीने कारावास व प्रत्येकी रूपये १,०००/- द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली द्रव्यदंडाच्या रकमेपैकी रक्कम रूपये ३०,००० इतकी रक्कम जखमी साक्षीदारास देण्याचे आदेश केलेले आहेत.

सदरच्या खटल्यात सरकारपक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता चंद्रकांत दिनकरराव सपकाळ, यांनी काम पाहीले तसेच, त्यांना अति. सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले, अति. सरकारी अभियोक्ता व्हि. के. भोर्डे, यांनी सहकार्य केले, त्यांना पैरवी अधिकारी ए.एस.आय. नरेश चव्हाण, पो.कॉ. सुभाष हजारे, यांचे सहकार्य लाभले.

आरोपी
आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी
Share the Post:
error: Content is protected !!