ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

स्नेहसंमेलन

नेवासा – गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौंदळाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौंदाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे तर प्रमुख अतिथी म्हणून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि नेवासा तालुका गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजी कराड हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमासाठी सौंदळा गावातील त्याचप्रमाणे नेवासा परिसर कुकाना भेंडा शहापूर देवगाव इत्यादी परिसरातून पालकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोविड नंतर पहिल्यांदा असा कार्यक्रम झाल्यामुळे संपूर्ण गावातील ग्रामस्थ महिला भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमादरम्यान सौंदाळा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच इतर सदस्य यांच्याकडून शाळेसाठी 25 बेंचेस एक लॅपटॉप व प्रिंटर यासह जवळपास एक लाख रुपयांचे साहित्य वितरित करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी आपल्या मनोगतामध्ये सौंदळा शाळा ही केवळ तालुक्यापुरती मर्यादित नसून जिल्ह्याला मार्गदर्शक रस्ता दाखवणारी शाळा आहे असे शाळेचे वर्णन केले. त्याचप्रमाणे नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये सायबर सुरक्षा आणि मोबाईलचा अतिवापर याचे तोटे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे मागील वर्षात घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर वर्ग प्रतियोगिता विजेत्या वर्गासाठी ग्रामपंचायत कडून एक डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड ग्रामपंचायत कडून देण्यात येणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.

मुख्याध्यापक श्री नेहूल सर यांनी शाळेसाठी शौचालय बांधून देण्याची मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडे केली त्याचप्रमाणे शाळेच्या इतर प्रगती बद्दल माहिती दिली.या कार्यक्रमासाठी एकूण जवळपास 80 हजार रुपये लोकसहभाग रोख स्वरूपात प्राप्त झाला.तसेच सौंदळा शाळेत नव्याने हजर झालेले मुख्याध्यापक श्री पोपट घुले यांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र पागिरे सर यांनी केले.तर प्रास्ताविक राजेश पठारे सर यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमात तांत्रिक सहकार्य करण्याचे काम शाळेतील तंत्रज्ञाने शिक्षक श्री किशोर विलायते सर यांनी पाहिले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची संपूर्ण कार्यक्रम बसविणे व त्यांची तयारी करून घेण्याचे काम शाळेतील शिक्षिका सौ संजीवनी मुरकुटे व कल्पना निघुट यांनी केले. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल चामूटे,उपाध्यक्ष राजेंद्र आरगडे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व समस्त ग्रामस्थ सौंदाळा यांचे सहकार्य लाभले.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेहसंमेलन
Share the Post:
error: Content is protected !!