ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा – हॉटेल व्यवसायकास खंडणी मागितल्या प्रकरणी सराईत गुन्हेगार स्वप्निल ज्ञानदेव गरड रा. सौंदाळा याच्यावर काल नेवासा पोलीस ठाणे येथे खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कुदबुद्दीन हसूलाल शेख रा. देवगाव, ता. नेवासा यांनी पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती. सदरच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान सहिता क. 385, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तुमच्या हॉटेलवर काय धंदे चालतात ते मला माहिती आहे, तुम्ही वेशा व्यवसाय चालवता, बाया नाचवता, त्यामुळे तुम्हाला जर तुमचे आरमान हॉटेल चालवायचे असेल तर तुम्ही मला महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा मी पत्रकार असल्याने तुमची पेपरमध्ये बातमी छापून बदनामी करीन, तुमचे हॉटेल चालू देणार नाही, मी चांगले चांगले लोक कामाला लावले आहेत असे म्हणून फिर्यादीस भीती घालुन खंडणीची मागणी केली. वास्तविक पाहता स्वप्निल गरड हा कसलेही प्रकारचा पत्रकार नाही.

स्वप्निल गरड हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर यापूर्वी खंडणी मागणीचे दोन गुन्हे, शासकीय मालमत्ता विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत एक गुन्हा, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अंतर्गत एक गुन्हा व चोरीचा एक गुन्हा असे एकुण ५ गुन्हे नोंद आहेत.

वारंवार कायदा हातात घेणाऱ्या व खंडणी मागणाऱ्या अशा खंडणीखोर लोकांवर कायद्याचा कठोर बडगा उगारला जाईल व त्यास कायद्याच्या कचाट्यात जखडलं जाईल, जेरबंद केलं जाईल असा सक्त ईशारा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला आहे.

ब्लॅकमेल करून नागरिकांना कोणी छळत असेल त्रास देत असेल तर अशा नागरिकांनी न भिता, न डगमगता निर्भीडपणे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना सरळ भेटावे व पोलिसात फिर्याद दाखल करावी म्हणजे कायद्याच्या माध्यमातून कसता येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील अधिकारी अंमलदार यांनी केली आहे.

newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
Share the Post:
error: Content is protected !!