ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जनावर

नेवासा – शहरातील खाटीक गल्लीत कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेल्या १ गाय, ४ वासरे, १ वागर गोवंशीय जनावरांचे स्थानिक गुन्हा शाखा अहमदनगर यांनी आरोपीच्या तावडीतून पहाटे ५ वाजता सुटका केली.आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवासा शहरातील खाटीक गल्ली येथे गोवंशाचे जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली आहे अशी गुप्त माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हा शाखेला कळविण्यात आली.

माहितीची शहनिशा करण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशनचे हे.कॉ.संतोष राठोड, पो.ना.शहाजी आंधळे यांना पाठविले असता सदरील माहिती ही खरी असल्याचे त्यांनी सांगितले. सदरील कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, स.फौ.राजेंद्र वाघ, स.फौ. उमाकांत गावडे, हे.कॉ.दत्तात्रय गव्हाणे, हे.कॉ.ज्ञानेश्वर शिंदे, हे.कॉ.विशाल दळवी, पो.ना.संदीप दरंदले यांच्या पथकाने पहाटे ५ वा. छापा मारून घराशेजारील मोकळ्या पटांगणात कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेली एक जर्सी गाय,

चार वासरे, एक वागर अशी ५० हजार रुपयांची गोवंशीय जनावरांची आरोपी नदीम चौधरी, अकील चौधरी, बब्बू चौधरी, सर्व रा. खाटीक गल्ली.नेवासा.यांच्या ताब्यातून सुटका केली.सदरील कारवाईची आरोपींना चाहूल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. त्यांच्या विरोधात नेवासा पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारण अधिनियम कायदे अंतर्गत सन २०१५ कलम ५,५(अ)(ब)९(ब),सह कलम ३,११ प्रमाणे पो.ना. संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newasa news online
जनावर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनावर
जनावर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनावर
Share the Post:
error: Content is protected !!