ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रेशनकार्ड

नेवासा – तालुक्यातील खेडले परमानंद येथील गेल्या दहा वर्षापासून नव्याने रेशन कार्ड ऑनलाइन प्रक्रियेत असलेल्या रेशनकार्ड धारकांना गरजवंत गरीब कुटुंबाला रेशन मिळत नसल्याने गेल्या दहा वर्षापासून ऑनलाईनचा सावळा गोंधळात सामान्य जनतेचे कशी फरफट सुरू आहे, याचा भांडाफोड खेडले परमानंद येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांनी चव्हाट्यावर आणल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेवासा तालुक्यातील छोट्याशा खेडले परमानंद गावात अशी परिस्थिती असेल तर मोठ्या गावामध्ये ऑनलाइन प्रक्रियेत कशी परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा पुरवठा विभागाकडून ऑनलाइन च्या नावाखाली सरळ सरळ दिशाभूल केली जात आहे खेडले परमानंद येथील गरीब कुटुंबाला रेशन पासून वंचीत राहव लागत आहे. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित यंत्रणेतील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का ? हा मोठा प्रश्न आहे.

ऑनलाइनच्या नावाखाली गरीब कुटुंबाची सरळ सरळ फसवणूक सुरू असून याला कुठेतरी पाय बंद घालायला हवा. तलाठी , स्वस्त धान्य दुकानदार व तालुका पुरवठा विभाग यांचा ऑनलाइन च्या नावाखाली सावळा गोंधळ सुरू आहे संबंधिताचे रेकॉर्ड चेक केल्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आले आहे .सन 2007 पासून मयत झालेल्या व्यक्तीचे नाव कमी न केल्यामुळे नवीन प्रक्रियेत असलेल्या गरीब कुटुंबातील रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देत नसल्याची तक्रार खेडले येथील ग्रामस्थांनी केली होती त्यानंतर याबाबत शिंदे यांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.

ऑनलाइनच्या प्रक्रियेला जे कोणी दोषी अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. रेकॉर्ड दुरुस्तीचे काम कोणाचे आहे त्यांनी दिरंगाई केलेली असल्याने त्यांना शासन झालेच पाहिजे. अशी मागणी खेडले परमानंद येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रेशनकार्ड ऑनलाइनच्या नावाखाली सावळा गोंधळ सुरू असून महसूल यंत्रणेतील या गोंधळामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना केंद्र सरकार कडून मोफत धान्य मिळत असताना सुद्धा ते मध्येच कुठेतरी गायब केले जाते याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .

महसूल यंत्रणेतील या प्रक्रियेमध्ये वेगळी यंत्रणा कार्यरत असल्याचा संशय येत असून याचा भांडाफोड झाला पाहिजे . महसूल यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी स्वस्त धान्य दुकानदार यांची मिली भगत असून गरिबाला मिळणाऱ्या धान्यावर लाभ उठवणारे बोके सोकलेले असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याने याला कुठेतरी आवर घालणे गरजेचे आहे.

रेशनकार्ड
रेशनकार्ड

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रेशनकार्ड
रेशनकार्ड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रेशनकार्ड
Share the Post:
error: Content is protected !!