ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि. १८ मार्च रोजी रफिक याकुब सय्यद व नयिम रफिक सय्यद या दोघांना मारहाण केल्या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी ने आपल्या घराचे काम करावयाचे असल्याने त्याठिकाणी लावलेला टेम्पो आरोपीस काढण्यास सांगितला होता.

त्याचा राग मनात धरून फायटरच्या सहाय्याने मारहाण करत याकुब सय्यद व नयिम सय्यद या दोघांना जखमी केल्या प्रकरणी रफिक याकुब सय्यद वय ५४ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी आरिफ हसन पिंजारी, आरबाज हासन पिंजारी, सलमान असलम पिंजारी, सर्व राहणार सोनई यांचे विरुद्ध गुरनं.३२३, ३२४,५०४,५०६ प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
Share the Post:
error: Content is protected !!