ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शेअर मार्केट

नगर तालुक्यातील जेऊर येथील अनेक महिलांना बनावट मसाला कंपनीचे नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा संशय आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ विधाते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरामधील महिलांना बनावट मसाला कंपनीच्या नावाखाली गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेवासा तालुक्यातील रहिवासी असून त्याने गावातीलच एका महिलेच्या आधाराने सर्वसामान्य महिलांना फसविले आहे.

अमिष दाखवून महिलांची फसवणूक

महिलांकडून ७० रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळण्यात आली आहे. लॅपटॉप, कंपनीत नोकरी, जागा भाडेतत्त्वावर घेणे, दुचाकी गाडी, दिल्ली सहल तसेच विविध अमिष दाखवून महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय देखील विधाते यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.

गोरगरीब महिलांनी मजुरी करून सदर आमिषाला बळी पडत पैसे भरलेले आहेत. अनेक महिलांची फसवणूक झाली असली तरी सर्वच महिला समोर येत नाहीत. काही महिलांच्या रक्तांची तपासणी देखील करण्यात आली आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची निपक्षपाती सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शामभाऊ विधाते यांनी केली आहे.

फसवणूक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

फसवणूक
फसवणूक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

फसवणूक
Share the Post:
error: Content is protected !!