ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पत्रकार

नेवासा – सध्या तालुक्यात वाहनांवर व ईतरत्र शासकीय कार्यालयात प्रेस नावाचा व पत्रकार पदाचा गैरवापर करणाऱ्या तोतया पत्रकारांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला असून या बोगस पत्रकारांवर कारवाई करा असे निवेदन नेवासा तहसीलदार संजय बिराजदार व नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना नेवासा प्रेस क्लब यांच्या वतीने बुधवारी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हंटले की, तालुक्यातील अनेक दुचाकी , चारचाकी आदि वाहनांवर प्रेस असे लिहून पत्रकार असल्याचे भासवून प्रेस नावाचा गैरवापर करून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना तोतया पत्रकार ब्लेंकमेलिंग करत आहे जहिराती च्या नावाखाली आर्थिक लूट करत आहे तसेच पोलीस ठाण्यात देखील वावर असतो ह्या गोष्टीं ला पायबंद घालावा जेणे करून लोकशाही चा आधारस्तंभ बदनाम होणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, गुरूप्रसाद देशपांडे, अशोक डहाळे, सुधीर चव्हाण, कैलास शिंदे, मकरंद देशपांडे, सुहास पठाडे, रमेश शिंदे, पवन गरुड,शंकर नाबदे, नानासाहेब पवार, अभिषेक गाडेकर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बोगस पत्रकारितेच्या नावाखाली वाहनांवर प्रेस नाव टाकून वापर करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणार व तोतया पत्रकारिता करणाऱ्यावंर योग्य कारवाईची मोहीम राबविण्यात येईल.
– धनंजय जाधव, पोलिस निरीक्षक

newasa news online
पत्रकार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पत्रकार
पत्रकार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पत्रकार
Share the Post:
error: Content is protected !!