ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अत्याचार

जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना संगमनेर तालुक्यातुन समोर आलेली असून इयत्ता दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर बदनामी होईल या भीतीने विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे . तब्बल पाच जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , 29 फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीत शिकत असलेली मुलगी रिसीट आणण्यासाठी म्हणून बाहेर गेलेली असताना सौरभ खेमकर नावाच्या नराधमाने तिला बळजबरी करत एका पान शॉप मध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला . इतर चार जणांनी देखील त्याला यावेळी मदत केली. 

दुसरा आरोपी योगेश खेमनर याने हा प्रकार होत असताना पान शॉपचे शटर बंद केले आणि बाहेरून कुलूप लावून घेतले. दुसरे दोन आरोपी प्रशांत भडांगे आणि विजय खेमनर यांनी या शॉपच्या बाहेर थांबून आरोपी सौरभ खेमनर याला मदत केली त्यानंतर आपली बदनामी होईल या भीतीने मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. 

मुलीच्या नातेवाईकांनी घारगाव पोलिसात दाखल होत आरोपी सौरभ खेमनर , योगेश रामा खेमनर ( दोघेही राहणार हिरेवाडी साकुर ), प्रशांत भास्कर खेमनर ( भडांगे वस्ती साकुर ), विकास रामदास गुंड ( गुंड वस्ती मांडवे बुद्रुक ) आणि विजय खेमनर ( हिरेवाडी साकुर ) यांच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

अत्याचार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अत्याचार
अत्याचार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अत्याचार
Share the Post:
error: Content is protected !!