ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कारागृह

नेवासा – पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एम.पी.डी.ए. कायद्याच्या अंतर्गत नेवासा शहरातील सराईत गुन्हेगार रविंद्र राजू भालेराव, (वय ३५ वर्ष) रा.नेवासा फाटा ता.नेवासा जि.अहमदनगर यास एक वर्षाकरिता नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. रविंद्र राजू भालेराव याच्यावर नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत खुनाचा प्रयत्न एक, दुखापत तीन, दरोडा एक, शासकीय कामात अडथळा आणणे एक, विनयभंग एक, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे दोन, बेकायदेशीर जमाव जमा करणे दोन अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यास त्या गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईत पणे गुन्हे करीत होता.

त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शास्त्र सोबत ठेवून लोकांवर दहशत व भीती निर्माण करत होता.त्यास कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होऊन लोकांच्या मनात असुरक्षितेची भावना तयार झाली होती.दिवसेंदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्याची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्वसामान्य लोकांच्या जीवितास तो उपद्रवी बनत होता.त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हात भट्टीवाले औषधी विषय गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेटेड)यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे.

याबाबत अधिनियम सण १९८१ नुसार धोकादायक व्यक्ती या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याच्याविरुद्ध सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी त्याच्याविरुद्ध चौकशी पूर्ण करून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे प्रस्ताव सादर करून सदर प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेच पाठविला होता.त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार क्रमांक डी.सी./ कार्या ९ क/१/७३/२०२४ अधिनियमा नुसार दि.३१/१/२०२४/ रोजी रविंद्र राजू भालेराव यास स्थानबंद्धतेचा आदेश जारी केला.

त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे, स.फौ.सुनील जरे, पो.कॉ.सुमित करंजकर, पो.कॉ.रामचंद्र वैद्य, पो.हे.कॉ.राम माळी, पो.हे.कॉ.राजेंद्र पांडे यांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करत त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृह रवानगी करण्यात आली.

newasa news online
कारागृह

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कारागृह
कारागृह

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कारागृह
Share the Post:
error: Content is protected !!