ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलिस

नेवासा – स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यानंतर बुधवारी रात्री नेवासा पोलिसांनी शहरातील खाटीक गल्लीतील कत्तलखान्यावर धाड टाकून सुमारे ३ लाखांचे २ हजार किलो गोमांस व ५ लाखांची गाडी, असा ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री उपनिरीक्षक संदीप ढाकणे, कर्मचारी बबन तमनर, सुमित करंजकर, गणेश जाधव, आप्पासाहेब तांबे, अरविंद वैद्य, भवार यांनी ही कारवाई केली.

अन्सार सत्तार चौधरी (रा. खाटीक गल्ली, नेवासा खु.) हा त्याच्या घराच्या मागे भरावाच्या वरील शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करत असल्याची माहिती माहिती मिळाली. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास अन्सार सत्तार चौधरी, आरिफ अमदार कुरेशी यांच्या कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी अन्सार चौधरी याने स्वतःच कत्तलखाना चालवित असल्याचे पोलिसांना सांगितले.

शेडमध्ये, तसेच इनोव्हा गाडीत ३लाखांचे २ हजार किलो गोमांस, तसेच वजनकाटा, लोखंडी सुरे, कानस असे साहित्य आढळून आले. एकूण ८ लाख १ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिस कर्मचारी गणेश फाटक यांच्या फिर्यादीवरून अन्सार चौधरी व आरिफ कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार संतोष धोत्रे तपास करीत आहेत.

newasa news online
पोलिस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलिस
पोलिस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलिस
Share the Post:
error: Content is protected !!