ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

गणेशवाडी – एकमेकांविरुद्ध फिर्यादी देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले व चक्क ठाणे अंमलदारा समोरच एकमेकांना भिडले. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २१ रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान लांडेवाडी येथील दोन गट झालेल्या भांडणाची फिर्याद देण्यासाठी सोनई येथील पोलीस ठाण्यात आले होते. अशातच त्यांच्यात समोरा समोर आल्या नंतर शाब्दिक बाचाबाची वाढत गेल्याने ते चक्क ठाणे अंमलदारा समोरच भिडले व शिवीगाळ करत एकमेकांना मारहाण करु लागले.

या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे पो. काॅ. प्रविण क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीत सार्वजनिक ठिकाणी येऊन शांततेचा भंग केल्या प्रकरणी लांडेवाडी येथील आरोपी रामेश्वर अशोक लांडे वय ४०, विजय अशोक लांडे, वय ३५,अन्य दोन महीला सर्व राहणार लांडेवाडी व सोपान यादव लोखंडे वय ४० रा. घोडेगाव यांचे विरुद्ध १२७/२०२४भा.द.वि कलम १६० महा. पोलीस कायदा कलम ११०/११७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. फौ. काकासाहेब राख हे करत आहेत.

यापुढे फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येतांना विनाकारण गर्दी करु नये. येतांना दोन समाजामध्ये तेड निर्माण करणारे इसम सोबत आणु नये व पोलिसांसमोर येऊन एकमेकांना हाणामारी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याचे उल्लंघण करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही.
– अशिष शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनई

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस
Share the Post:
error: Content is protected !!