ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलिस

नेवासा – नेवासा हद्दीत नेवासा-श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील कारवाडी गावचे हद्दीत ओम साई या हॉटेलचे चालक बाळासाहेब सखाहरी तुवर वय ६० वर्षे रा. पाचेगाव यांचा मध्यरात्री अज्ञाताने डोक्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने मारून खून केल्याचा प्रकार दिनांक 13/03/2024 रोजी उघडकीस आला होता. याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे गु.र नं. 251/2024 भा.द.वि. क. 302 अन्वये दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत होते.

गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी आव्हान स्वीकारून स्थानिक पोलीस स्टेशनकडील पाच पथके व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक असे एकूण सहा पथके मागील नऊ दिवस-रात्र तपास करीत होते.

तपासा दरम्यान पोलिसांना मिळालेल्या वेगवेगळ्या 34 प्रकारच्या इन्फॉर्मेशनवर मागील नऊ दिवस पोलीस तपास पडताळणी करीत होते. गुन्ह्याच्या संबंधाने जवळपास 120 लोकांकडे तपासणी केली होती.

घटनास्थळापासून साधारण 300 मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरील रात्रीच्या वेळचे अस्पष्ट आणि अंधुक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करताना घटनेच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीची आणि श्वानाची हालचाल पोलिसांना दिसून आली होती. पोलिसांनी तपासा दरम्यान सदर अंदाजे 30 वर्षे वय असलेली व्यक्ती आणि श्वान हाच केंद्रबिंदू निश्चित करून मागील नऊ दिवस त्यावरच तपास केला होता.

तपासामध्ये अशी वय वर्ष 30 असलेली कोणती व्यक्ती आहे की मृतकचा सदर व्यक्तीशी वाद भांडण वितृष्ट होते आणि सदर व्यक्तीकडे श्वान (कुत्रा) आहे याच्यावर लक्ष केंद्रित केले होते.
चौकट-50 पैशाच्या पोस्ट कार्डने केले काम

सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी काही व्यक्तींना नक्की माहिती असणार आहे हे तपाशी अधिकारी धनंजय जाधव पोलीस निरीक्षक जाणून होते. परंतु सदर व्यक्ती समोर येण्यास भीत घाबरत असल्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोस्टातून 50 पैशाचे 100 कार्ड विकत घेऊन त्या कार्डावर स्वतःचे नाव आणि पत्ता स्वतःच लिहून सदरचे कार्ड कारवाडी आणि पाचेगाव शिवारामध्ये वाटप करून आपल्याला आरोपी माहीत असल्यास या कार्डवर फक्त आरोपीचे नाव लिहून सदरचे कार्ड आपण कोणत्याही पोस्ट पेटीत टाकावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन कार्डद्वारे सदरचा खून पोपट सुदाम सूर्यवंशी या व्यक्तीने वैयक्तिक भांडणातून केला असल्याबाबत माहिती दिली होती.

श्वान बनला तपासाचा धागा दुवा”
पोलिसांनी आज पोपट सुदाम सूर्यवंशी या व्यक्तीस सिताफिने ताब्यात घेऊन पॉलिसी भाषेत विचारपूस केली असता सुरुवातीस त्याने असे काही केले असल्याबाबत नकार दिला. परंतु पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धीने त्यास विचारपूस केली असता पोपट पोपटासारखा बोलू लागला. आरोपी पोपट सुदाम सूर्यवंशी रा. कारवाडी याने सदर खून केल्याबाबतची कबुली दिली, जागा दाखवली.

काही दिवसापूर्वी मृतक हा चिकन घेऊन दुसऱ्या घरी बनवण्यास घेऊन जात असताना मृतक याची आरोपी बरोबर भेट झाली होती. त्यादरम्यान त्यावेळी तू दुसऱ्याच्या घरी चिकन बनवायला का घेऊन जातो यावरून आरोपी आणि मृत्यूकचा वादविवाद झाला होता त्यावेळी मृतकने आरोपीस मारहाण केली होती. याचा राग मनात धरून आरोपीने त्याचा काटा काढायचे ठरवले होते.

मंगळवारी 13/3/2024 रोजी घटनेच्या दिवशी आरोपी हा मृतक यांच्या हॉटेलवर गेला तेथे त्याने मृतकच्या डोक्यामध्ये दगडाने घाव केले आणि तेथून तो पळून गेला अशी कबुली त्याने दिली आहे.

सदरचा तपास मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पोलीस हवालदार बबन तमनर, पोलीस हवालदार केदार, पोलीस हवालदार कुसाळकर, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, नारायण डमाळे, गणेश फाटक, अंबादास जाधव, आप्पासाहेब तांबे व योगेश आव्हाड यांनी केला.

newasa news online
पोलिस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलिस
पोलिस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलिस
Share the Post:
error: Content is protected !!