ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शेतकरी

नेवासा – तालुक्यामध्ये सेवानिवृत्त प्राचार्य मुख्याध्यापक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची संजीवन ग्रुप संघटना आहे प्रत्येक महिन्यात सभा घेतली जाते व वैचारिक चर्चा घडते या महिन्याची मासिक सभा भेंडे येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मंगल कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष साहेबराव भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रस्तविकामध्ये प्राचार्य डॉक्टर अशोकराव ढगे यांनी शेतकरी संरक्षण कायद्याबाबत व त्यांच्या संदर्भातील मसुद्याबाबत माहिती दिली.

प्राचार्य दादासाहेब वाबळे यांनी हे कार्य मौलिक असून शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यास मदत करेल असे प्रतिपादन केले प्राचार्य जगन्नाथ कलापुरे यांनी यासंदर्भात आपल्या मुलांना नातवांना व सहकाऱ्यांना सक्रिय होण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले. अध्यापक शिवाजीराव कानडे यांनी हे कार्य विधायक व मौलिक असून जनजागृतीसाठी खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा अशा प्रकारची सूचना मांडली प्राचार्य परशुराम गणगे यांनी शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट असून आत्महत्या वाढत असल्यामुळे त्यांना संरक्षण देण्यासाठी क** कायदा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

शेतकरी संरक्षण कायद्याला भैय्यासाहेब देशमुख अशोक कटारिया रामकृष्ण नवले अशोक देशमुख जनार्दन शिंदे रामदास कोरडे व सर्व सदस्यांनी एक मुखी पाठिंबा जाहीर केला संजीवन ग्रुपचे जेष्ठ सदस्य व प्राचार्य रघुनाथ आगळे यांनी या विधायक व रचनात्मक कार्याला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर आणावे असा सल्ला दिला संघटनेचे माजी अध्यक्ष एस आर शिंदे सर यांनी समाजाने हा प्रश्न जनतेच्या रेट्याने सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली सर्वांचे ऋणनिर्देश अशोक कटारिया यांनी व्यक्त केले.

शेतकरी
शेतकरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेतकरी
शेतकरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेतकरी
Share the Post:
error: Content is protected !!