ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मराठा

नेवासा – तालुक्यातील मराठा आरक्षण,शेतकरी व विविध आंदोलनात सातत्यपूर्ण काम करणारे,तसेच जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे तालुकास्तरावर नेतृत्व करणारे ॲड.कारभारी वाखुरे,भाऊसाहेब वाघ प्रकाश निपुंगे,संतोष माळवे,संजय शिंदे,ॲड.बाळासाहेब कावळे,ॲड.हर्षल गोरे,ॲड.एम के वाखूरे,संदीप जाधव,वसुदेव जाधव,प्रकाश गरुटे,अमोल मोरे,सुनील शिरसाट,सुनील काळे,गणेश चौगुले,नितीन मीरपगार,अजय डौले,विठ्ठल नेहे,निलेश डौले,सुरेश वाकचौरे,राजेंद्र तांबे,किशोर गादे,रोहिदास सुरशे,चांगदेव माने यांनी त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुणबी दाखले व मराठा आरक्षण,तसेच समाजाच्या इतर प्रश्नांबाबत जी संवेदनशीलता आणि सकारात्मकता दाखवली आणि आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यां मध्ये सर्वोत्तम प्रयत्न केले.सर्वच समाज घटकांना न्याय देण्याचे काम ते करीत आहेत.यामुळेच आम्ही एकनाथजी शिंदे यांना साथ देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहोत अशी भूमिका या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करताना मांडली. यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे,शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख मीराताई गुंजाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

newasa news online
मराठा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मराठा
मराठा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मराठा
Share the Post:
error: Content is protected !!