ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

यात्रा
यात्रा

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील मांगिरबाबा यात्रा उत्सवात रविवार दिनांक 24 मार्च पासून सुरुवात होत असून, सालाबाद प्रमाणे या ही वर्षी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असून तीन दिवस यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

रविवार दिनांक 24 रोजी विनोदाचार्य हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज निकम यांचे जाहीर हरी किर्तन होणार असून, सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजता कावडी मिरवणूक निघणार आहे, सकाळी नऊ वाजता ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीस चोळी पातळ चा कार्यक्रम होणार आहे, त्याच दिवशी सायंकाळी भव्य छबिना व हारून भाई शेख यांचे शोभेचे दारू काम होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बँड या यात्रेमध्ये हजेरी देण्यासाठी येत असतात त्यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम रात्रभर होत असतो घोडेगाव व पंचक्रोशीतून नागरिक ही जुगलबंदी बघण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी रात्री नऊ वाजता महाराष्ट्रातील नामवंत तमाशा मंडळ रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य चा कार्यक्रम मोफत दाखवण्यात येणार आहे. या यात्रा उत्सवात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

यात्रा
यात्रा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यात्रा
यात्रा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यात्रा
Share the Post:
error: Content is protected !!