ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दोन गटात हाणामारी झाल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी नोंदवली आहे. पहीली फिर्याद सिमोन विकास भालेराव वय २४ रा आंबिकानगर सोनई यांनी दि. २० मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी पप्पू वैरागर , पिंटू वैरागर, भोल्या वैरागर, सुयोभ वैरागर, संदेश वैरागर सर्व राहणार आंबिकानगर सोनई यांनी फिर्यादी घरासमोर बसला असताना तु आमच्या मुलीच्या अंगावर का थुंकला म्हणत मारहाण केली व जिवे मारण्याच धमकी दिली.

त्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा र. नं.कलम १३१/२०२४, १४३,१४७,१४८,१४९,३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना बाळासाहेब बाचकर हे करत आहेत. तर दुसरीकडे दि. २० मार्च रोजी ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी पिडीत मुलगी घरासमोर काॅलेजला पायी जात असताना आरोपी सिमोन विकास भालेराव याने रस्त्यात अडवून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

व शिवीगाळ करत घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देत समाजामध्ये बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावरून आरोपी सिमोन विकास भालेराव रा. आंबिकानगर सोनई याचे विरुद्ध गु. रजि. नं. क. १३२/२०४, भा. द. वि. कलम ३५४,३५४(अ), ३५४(ड), ५०४,५०६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ. आर. लबडे हे करत आहेत.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस
Share the Post:
error: Content is protected !!