ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अलकाताई

नेवासा – राज्य परिवहन महामंडळाच्या नेवासा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल पा.ता ताके यांनी संघटनेचे नेवासा आगार महिला प्रतिनिधी म्हणून ऍड.श्रीमती अलकाताई विठ्ठलराव जंगले पाटील यांची नियुक्ती केली आहे. ऍड. श्रीमती अलकाताई जंगले यांनी आजपर्यंत विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून निस्वार्थी पणे सामाजिक कार्य केलेले आहे.

त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन व ऍड .जंगले यांचा महिला व विद्यार्थिनी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेलि तळमळ लक्षात घेऊन त्यांची नेवासा तालुका प्रवासी संघटनेच्या नेवासा एस. टी.आगारच्या महिला प्रतिनिधी म्हणून अनिल ताके यांनी ऍड.श्रीमती अलकाताई जंगले यांची निवड केली आहे. त्यांना नियुक्ती चे पत्र नुकतेच श्री ताके यांनी दिले आहे.

यावेळी नेवासा तालुका कुणबी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.निलीमताई वाबळे पाटील, अशोकराव वाबळे, प्रा. नितीन धस आदी उपस्थित होते. ऍड. श्रीमती अलकाताई जंगले यांच्या सदर निवडीबद्दल त्यांचे नगर जिल्हा प्रवासी संगटनेचे संस्थापक रणजीतजी श्रीगोड, तालुका सचिव पत्रकार सुधीर चव्हाण, रामभाऊ कडु पा., रामराव पा. भदगले यांनी अभिनंदन केले आहे.

newasa news online
अलकाताई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अलकाताई
अलकाताई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अलकाताई
Share the Post:
error: Content is protected !!