ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दारू

गणेशवाडी – सोनई पोलीसांनी सध्या परिसरातील अवैध धंद्याविरुध्द धडक मोहीम सुरू केली आहे. लोहगाव, घोडेगाव, पाठोपाठ आता खेडले परमानंद, मांडेमोरगव्हाण शिवारात गावठी दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे. घोडेगाव चांदा रोडच्या कडेला एका हाॅटेल जवळ मांडेमोरगव्हाण शिवारात २२५० किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करत कारवाई केली. पो. काॅ. ज्ञानेश्वर आघाव यांचे फिर्यादी वरुन बालु मधुकर भोसले वय ३६ रा घोडेगाव याचे विरुद्ध १३३/२०२४ कलम ६५(ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

पुढील तपास पोहेकाॅ एन आर तुपे हे करत आहेत. दुसरी कारवाई खेडले परमानंद येथील काटवणात ४३०० रुपये किंमतीची ४३ हातभट्टीची गावठी दारू जप्त केली आहे. पोकाॅ. गोरक्षनाथ जावळे यांचे फिर्यादी वरुन गोकुळदास रामचंद्र सुर्यवंशी वय ६० रा. खेडले परमानंद याचे विरुद्ध १३७/२०२४कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सफौ. ए. एम. दहिफळे हे करत आहेत. त्याचप्रमाणे विना परवाना वाहन चालक, विना नंबर प्लेट बेशिस्त पणे वाहन चालवणऱ्यांवीरुध्द सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके यांनी सध्या धडक कारवाई मोहीम हाती घेऊन कारवाया करत आहेत. यांच्या या कारवाई ने मात्र अवैध धंद्यांवाले त्याचप्रमाणे बेशिस्त पण वाहन चालकांनी देखील याचा धसका घेतला आहे.

यापुढे अवैध धंद्याविरुध्द विरुद्ध कारवाया ची मोहीम ही सुरुच राहणार. त्याचप्रमाणे शाळा काॅलेज परिसरातील टारगटांवर देखील यापुढे कारवाया करणार. बेशिस्त पणे विना लायसन्स व सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर देखील कारवाई मोहीम ही सुरू च राहणार.
– अशिष शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक.

दारू
दारू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारू
दारू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारू
Share the Post:
error: Content is protected !!