ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

किर्तन

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव (राजेगाव) येथे पंचमदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ मार्च ते ३० मार्च या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन सदगुरू पंढरीनाथ महाराज तांदळे सेवा साधक आश्रम यांचे वतीने करण्यात आले आहे. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज माऊली जोशी यांचे हस्ते ध्वजारोहण होईल तर ह. भ. प. विश्वासमामा गडाख व माजी सैनिक पदाधिकारी यांचे हस्ते दीपप्रज्वलन होईल.

दैनदिन कार्यक्रम मध्ये रोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी ३ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ते ६ हरिपाठ, ७ ते ९ हरिकीर्तन तदनंतर रोज महाप्रसाद. दि. २६ मार्च रोजी ह.भ.प.महंत आदिनाथ महाराज शास्री श्री क्षेत्र तारकेश्वर गड, दि २७मार्च रोजी सकाळी तुकाराम महाराज बिज निमित्ताने ह. भ. प. रामेश्वर महाराज कंठाळे सर भेंडा यांचे सकाळी १० ते १२ हरी किर्तन होईल.

तर सायंकाळी ह. भ. प. कैलास महाराज गिरीजी, दि. २८ मार्च रोजीह. भ. प. संजय महाराज सरोदे बेलपिंपळगाव, दि. २९ मार्च रोजी किर्तन रत्न बाळासाहेब महाराज शेवाळे आळंदी दि. ३० मार्च रोजी शांतीब्रम्ह महंत भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड देवस्थान यांचे काल्याचे किर्तन होवून महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाने या किर्तन महोत्सवाची सांगता होईल. तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेण्याचे घोडेगाव (राजेगाव) येथील सदगुरू पंढरीनाथ महाराज तांदळे सेवा साधक आश्रम यांचे वतीने कळविण्यात आले आहे.

किर्तन
किर्तन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किर्तन
किर्तन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किर्तन
Share the Post:
error: Content is protected !!