ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

तुकाराम महाराज

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव (राजेगाव) येथे सुरू असलेल्या पंचमदिनी किर्तन सोहळ्यात तुकाराम महाराज बिजेनिमित्त आम्ही जातो तुम्ही क्रुपा असु द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. या संत तुकाराम महाराजांच्या अगावर बोलताना सांगितले की काही कथांमध्ये श्री संत तुकाराम महाराजांचे चार वेळा स्वर्गारोहण झाल्याचे सांगितले जाते. याप्रमाणे महाराजांचे प्रथम स्वर्गारोहण झाल्यावर ते संताजी जगदाळे या वारक-यास टाळ दिंडी देण्यासाठी पुन्हा भूतलावर आले होते. यानंतर दुस-या स्वर्गारोहणात बारा अभंग लिहण्यासाठी पुन्हा भूतलावर आले. तिसरे स्वर्गारोहण झाले तेव्हा शिष्य निळोबाराय आणि कान्होबाराय यांना उपदेश करण्यासाठी पुन्हा देहूत अवतरले होते.

यानंतर महाराजांचे चौथ्यांदा प्रयाण झाले. चौथ्या प्रयाणानंतर ते भागीरथीसाठी पुन्हा देहूगावी आले होते. महाराजांचे चौथे स्वर्गारोहण हे शेवटचे स्वर्गारोहण होते. चौथ्या प्रयाणाच्या वेळी महाराज लोकांना सांगत जात होते. बाबांनो मी चाललोय, कृपा असू द्या तुमची. माझी विनंती सगळ्या लोकांना सांगा.. शेवटच्या कीर्तनाला म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीयेला महाराजांचे स्वर्गारोहण झाले. दुपारी १२ वाजता महाराज वैकुंठाला गेले. ही वार्ता भागीरथीला कळाली यानंतर तिने तुकाराम नामाचा जप केला म्हणून महाराज चौथ्यांदा पृथ्वीवर आले होते. महाराज वारक-यांना संबोधतात की, आता तुम्ही पंढरीरायाला बोलवा.
महाराजांच्या नावाने यमाचाही थरकाप उडतो. त्यामुळे आजच्या दिवशी त्याचा गजर केला पाहिजे. असे बोलताना रामेश्वर महाराज कंठाळे यांनी सांगितले.

तुकाराम महाराज
तुकाराम महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तुकाराम महाराज
तुकाराम महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तुकाराम महाराज
Share the Post:
error: Content is protected !!