ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराज

नेवासा – नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरा मध्ये तुकाराम बिजेनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याची हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते काल्याचे किर्तनाने दहीहंडी फोडून उत्साहात सांगता करण्यात आली.जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी संतांच्या परमार्थाला उंचीवर नेण्याचे काम केले म्हणून ते कलशाच्या स्थानी असून वारकरी संप्रदायातील परमार्थ त्यांच्या भक्तीने फुलला असल्याचे प्रतिपादन हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले.
           
यावेळी बोलतांना हभप उद्धवजी महाराज मंडलिक म्हणाले की प्रपंचातील सुख हे आटणार आणि विटणार असे आहे,पारमार्थिक सेवेतून खरे समाधान असून ते संसारात मिळत नाही,परमार्थाच्या सेवेतून परमात्म्याच्या प्राप्ती होत असते,अध्यात्म हे संकट ओळखण्याचे दृष्टी देते,चांगले सुविचार जीवनात प्राप्त होण्यासाठी भावी पिढीला अध्यात्मिक शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.संत वाड्मय हे गोड असे असून भक्त ही तल्लीन होतो,वाणीमध्ये चांगल्या गोष्टी येण्यासाठी हरिनामाचा छंद अंगीकारा असे आवाहन करून त्यांनी तुकाराम बिजेनिमित्त संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्याचे वर्णन केले.

झालेल्या काल्याच्या कीर्तनात भगवान परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन काल्याच्या कीर्तनात बोलताना त्यांनी केले.संतांनी दिलेला परमार्थ संत तुकाराम महाराजांनी भक्तीच्या माध्यमातून उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला म्हणूनच ते वारकरी संप्रदायातील कलशाच्या स्थानी जाऊन पोहचले,संत तुकाराम महाराजांच्या  वैकुंठगमनाने अलौकिक चरित्र घडले असे त्यांनी सांगितले.यावेळी संत सेवेकरी रखमाजी नाचन व कृष्णा शिंदे यांच्या वतीने संतपूजन करण्यात आले. यावेळी गाथा पारायण सोहळ्याच्या प्रसंगी योगदान देणाऱ्यांचा गौरव ह.भ.प. उद्धव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.उपस्थित भाविकांना विखोना व ताराबाई भाऊसाहेब पाटील व संजय पाटील परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी झालेल्या बीज सोहळा सांगता प्रसंगी भागवताचार्य अंकुश महाराज जगताप,नारायण महाराज नजन, लक्ष्मीनारायण जोंधळे,साहेबराव चावरे,महाराज माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,युवा नेते उदयन गडाख,नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,शंकरराव लोखंडे,इंजिनियर सुनीलराव वाघ,डॉ. लक्ष्मणराव खंडाळे, पी. आर.जाधव, विष्णूपंत ठोसर,महेंद्र महाराज शेजुळ,माजी सरपंच सतीश गायके, बाबासाहेब महाराज सातपूते,सुनील महाराज पारे,सेवेकरी गणेश डोंगरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराज
महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराज
महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराज
Share the Post:
error: Content is protected !!