ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवाजी महाराज

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे तिथी नुसार होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शिवनेरी ते गणेशवाडी पायी ज्योतीचे ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.या पायी ज्योती मध्ये एकुण शंभर मुलांनी आपला सहभाग नोंदवला होता.या सोहळ्याचे हे सातवे वर्ष आहे. सोनई ते गणेशवाडी ढोल ताश्यांच्या गजरात या ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद चे सुनीलभाऊ गडाख व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके यांचे हस्ते प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली.

तदनंतर सायंकाळी ७ ते ९ ह. भ. प. गोरक्षनाथ महाराज देठे यांचे हरी किर्तन सोहळा पार पडला त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी सरपंच कैलासराव दरंदले, पोलीस पाटील संजय दहिफळे, तंटामुक्ती चे अध्यक्ष विठ्ठल बडे,रामदास दरंदले,सेवा निव्रुत्त मेजर भाऊसाहेब तांदळे, प्रविण शेटे . छत्रपती ग्रुप चे सर्व सदस्य, रामेश्वर काळे, संदिप दरंदले, युवराज शेटे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवाजी महाराज
Share the Post:
error: Content is protected !!