ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवजयंती

नेवासा फाटा – मुकिंदपुर येथील शिवमहाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळेस मुकिंदपुरचे नवनियुक्त उपसरपंच ॲड.अशोक करडक यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जागतिक स्तरावर आज मोठ्या प्रमाणात साजरी होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे महत्त्व सांगून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.तसेच मराठा सेवा संघाचे शिवश्री रावसाहेब घुमरे पाटील यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.तसेच प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बादल परदेशी यांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देऊन उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

तसेच शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा सुकाणु समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे, प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बादल परदेशी, दैनिक लोक परिवर्तन चे संपादक आबासाहेब शिरसाठ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.तसेच या कार्यक्रमा प्रसंगी मुकिंदपुरचे उपसरपंच ॲड.अशोक करडक, दैनिक सकाळचे पत्रकार अमोल मांडण, पत्रकार संदीप वरकड, नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्था वसुली अधिकारी सचिन मुंडे, सचिन परदेशी, शिवबा संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष बाबासाहेब चाफे, ओम साई मेडिकलचे संचालक अजय रोटे पाटील, अशोक गव्हाणे, धोंडीराम गव्हाणे आदी मान्यवर व शिवभक्त उपस्थित होते.

newasa news online
शिवजयंती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती
Share the Post:
error: Content is protected !!