ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वारकरी

नेवासा – नेवासा बुद्रुक येथील श्री विश्वेश्वर नाथबाबा मंदीरात नाथ बाबा पुण्यतिथी सोहळा आयोजित त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयाची शुक्रवारी दि.२८ मार्च रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी भागवताचार्य स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली काल्याचा अर्थ म्हणजे सामाजिक समता , वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला विचारांची फार मोठी देणगी दिलेली आहे. स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नेवासे तालुक्यातील संत मंडळी मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित होते.

   यावेळी बोलताना स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की देव हा भाव आणि भक्तीचा भुकेला असून त्याला दुसरे काहीही लागत नाही,भाव आणि भक्तीने देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करा, जात भेद विरहित , धर्मभेद विरहित , वर्णभेद विरहित द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने ” समतेचा काला ” सुरू केला. लाखो वर्षाची परंपरा असलेल्या काल्याचे महत्त्व आजही वारकरी संप्रदायाने टिकवून ठेवले आहे. वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते परमार्थ करण्यासाठी फार मोठी तपश्चर्या करण्यापेक्षा घर प्रपंच , आई-वडील , नातीगोती व्यवस्थित सांभाळली तरी प्रपंच नेटका होतो आणि परमार्थही होतो असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काल्याची दहीहंडी फोडून विश्वेश्वर नाथबाबा मंदीरात नाथ बाबा यांच्या मंदिर प्रांगणात चाललेल्या त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयाची सांगता करण्यात आली.यावेळी सोहळयात अन्नदान व योगदान देणाऱ्यांचा श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सोहळा यशस्वीतेसाठी नेवासे बुद्रुक येथील भक्त मंडळ सेवेकरी यांनी विशेष प्रयत्न केले.

newasa news online
वारकरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वारकरी
वारकरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वारकरी
Share the Post:
error: Content is protected !!