ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पुरस्कार

नेवासा – पुणे येथील गायन क्षेत्रातील अनेक कलाकारांचे प्रेरणास्थान असलेल्या कलारत्न अजय अंबादास कुलकर्णी यांना नेवासा खडका रोडवर असलेल्या शरणपूर वृध्दाश्रमाच्या वतीने वृद्धाश्रमाला करत असलेल्या मदतीमुळे अन्नदाता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शरणपूर वृद्धाश्रम स्थापन झाल्यापासून वर्षभर होणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आर्थिक मदतीचा हात दरवर्षी माता पिता तसेच काका काकु यांच्या स्मृती प्रित्यर्थ वेळोवेळी अन्नदान यामुळे अजय कुलकर्णी यांनी अन्नदाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत कांदे,जेष्ठ विधी तज्ञ अँड.के.एच. वाखुरे यांच्या हस्ते सदरचा पुरस्कार अजय कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वाघ,रामदास अवचरे,मुळा कारखान्याचे संचालक निलेश पाटील,प्रकाश निपुंगे,राजू शेख,सौ. पुष्पाताई अवचरे, शिक्षिका मीनाक्षी अवचरे,संतोष मगर,शरद चव्हाण, वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर,वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे,संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांच्यासह वृद्धाश्रमातील आजी आजोबा उपस्थित होते.

पुरस्कार
पुरस्कार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरस्कार
पुरस्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरस्कार
Share the Post:
error: Content is protected !!